अंगणवाडीत तुम्ही सर्वच गेले असतील पण तुम्ही कधी विचार केलाय का ओ की अंगणवाडी कोणी सुरु केली ? अंगणवाडीच्या जनक !
अनुताई वाघ व ताराबाई मोडक या दोन महाराष्ट्राच्या कन्या ज्यानी भरताला अंगणवाडीची ओळख करुन दिली.
वयाच्या सोळाव्या वर्षी अचानक वैधव्य आले.
ज्या वयात आपण हासत खेळत शाळा शिकत होतो त्या वयात त्यांच्या वाट्याला डोंगरा येवढ संकट बघाव लागल.
त्या काळातील चाली रिती आणि रुढी परंपराच्या विरुद्ध जाऊन त्यांनी शिक्षण चालूच ठेवल.
नोकरी करता करता रात्रशाळेत शिक्षण घेतल,
डोळ्यात मोतीबिंदू आसुनही त्यांनी शिक्षणाचा हात सोडला नाही व आपल्या सोबत वाचक घेऊन आपले शिक्षण चालू ठेवले.
अनुताईनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना शिकवले.
ब्रिटिश सरकार मॉडम मॉंटेसरीची शिक्षणाची पद्धत भारतात घेऊन आले.
पण ही पद्धत सगळ्यांनी अमलात आणावी आशा काही नियम न्हवता,
कारण दोन्ही देशातील संस्कृती,समाज,भूगोल हे वेगवेगळे होते ज्याचा कुठच ताळ मेळ न्हवता.
आशा परिश्तिती मूलांना काय शिकवणार ब्रिटिश पद्धत ?
याला उपाय शोधण्याची जबाबदारी अनुताई व त्यांच्या गुरु ताराबाई मोडक यांच्या वर आली व त्यातून जन्मली "अंगणवाडी" .
मूलांना शिक्षणापेक्षा महत्वाच आसतय ते खेळण !
आणी याच गोष्टीचा फायदा घेत अनुताईंने शिक्षण देने चालू केले ज्यात खेळण्याचा,गोष्टींचा,बालगीतांचा समावेश केला होता.
त्यासाठी त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा सहारा घेतला आणि स्वत: बनवलेल्या शिक्षणसाहित्याचा वापर करुन मुलांना हाताळयची कला शिकुन घेतली.
लहान मूलांना आपण शिकलो हे न कळू देता सर्व गोष्टी शिकवण्याचे काम अनुताई करत होत्या.
गोष्टी,बालगीते,खेळ यातुन त्यांनी मुलांना कसे शीकवावे याची बरीच साधनं तयार केली, या लहान मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवले पाहिजे याची माहिती अंगणवाडी शिक्षिकांना दिली.
येवढच नाही तर डोंगर दर्यात असलेल्या आदिवशी पाड्यांवर जावुन त्यांच्या मुलांना शिक्षणाचे महत्व समजून सांगीतल आणि ते जर शाळेपर्यंत एवशकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे या मतावर त्या ठाम होत्या.
१७ मार्च १९१० ला पुण्यासारख्या नावाजलेल्या शहरात अनुताईंचा जन्म झाला.त्यांच्या या समाजकार्या मुळे त्या सामाजीक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ म्हणून ओळखल्या जावू लागल्या.
अनुताईंच वयक्तिक अयुष्य खुपच खडतर होत.
तरी सुद्धा त्यांनी यातून सतत मार्ग काढला व पुढे गेल्या.
महाराष्ट्र शासनाकडू त्यांना आदर्श शिक्षिका आणि दलित मित्र हे पूरस्कार देण्यात आले याच बरोबर सावित्रीबाई फुले पूरस्कार,बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार,जमनालाला बजाज पुरस्कार,आदर्श माता, आशा भोसले पुरस्कार,व रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार इत्यादी पुरस्कार अनेक संस्थानी त्यांना गौरावले.
१९८५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना "पद्मश्री" पुरस्काराने सन्मानित केले.
अनुताईंनी पुस्तक आणि माशिके या मधून पण शिक्षणाचा प्रसार केला,
"सावित्री" व शिक्षणपत्रिका" ही दोन माशीके चालवली
"कुरणशाळा", "विकासाच्या मर्गवर", "सहज शिक्षण",
व "बालवाडी कशी चालवावी" ही त्यांची पुस्तकं प्रशिध आहेत व "कोसबाच्या टेकडीवरुन" हे त्यांचे आत्मवृत्त खरच प्रेरणा देनार आहे.
तर मंडळी ह्या होत्या अंगणवाडीच्या जनक "अनुताई वाघ" मी आशा करतो की तुम्हाला "अंगणवाडीत तुम्ही सर्वच गेले असतील पण तुम्ही कधी विचार केलाय का ओ की अंगणवाडी कोणी सुरु केली ? अंगणवाडीच्या जनक !" हा लेख आवडला असेल.
तुम्हाला अंगणवाडी कोणी चालू केली हे आधीच माहित होते का ? आम्हाला कामेंट मध्ये नक्की कळवा.
धंन्यवाद!!
Pages
फॅक्टस इन मराठी
अंगणवाडीत तुम्ही सर्वच गेले असतील पण तुम्ही कधी विचार केलाय का ओ की अंगणवाडी कोणी सुरु केली ? अंगणवाडीच्या जनक !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)