ज्या काळात जगात कोणतही तंत्रज्ञान न्हवत त्या काळी नकाशे कशे बनवले होते ? भाग 1
आता आपण उपग्रहांच्या मदतीने कोणत्याही देशाचा अथवा भागाचा तंतोतंत नकाशा सहज उपलब्ध करू शकतो. मात्र जुन्या काळी नकाशा तयार करणं म्हणजे अग्निदिव्यच होत. भारताच्या नकाशाच्याआधी जगात नकाशांचा उगम कसा झाला व काळाप्रमाणे त्यात कसे बदल होत गेला ते आधी आपण जाणून घेऊ.
नकाशांचा जागतिक उगम व वापर
• मानवाला खूप आधीपासून नकाशांच महत्व लक्षात आले होत, इसवी सन पूर्व ४००० मध्येही लोक नकाशाचा वापर करत असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. १९६३ साली तुर्की मध्ये एका गुहेमध्ये जवळपास ६२०० वर्षा आधीच १ भिंतीवर काढलेल चित्र सापडल, अनेक संशोधकांच म्हणण आहे की ते नकाशाच आहे. असेच नकाशे चीन, भारत, आणि इजिप्त मध्येही सापडले. पण साधारणत: इसवी सन पूर्व ६०० मध्ये तयार केलेला पहिला परिपूर्ण नकाशा वरीलप्रमाने आजही उपलब्ध आहे. तो ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. तो नकाशा बॅबलोनिया या साम्राज्यामध्ये बनवला गेला होता. पण त्या नकाशामध्ये फक्त जवळपासच्या शहरांचा उल्लेख होता, पण अंतर हे जवळपास बरोबर आहे. यामुळे अनेक संशोधक याला जगातला पहिला नकाशा असे संबोधतात.
• जुन्या काळी नकाशा तयार करताना कोणतेही नियम नव्हते, जस की आता नकाशा बनविताना उत्तर दिशा वरती असते. व नकाशे हे त्या शहराचे किंवा एखाद्या व्यापारी मार्गापर्यंत सिमित असायचे.
• हे लोक जेव्हा दोन शहरांमध्ये अथवा राज्यांमध्ये पायी, घोडे-उंटावरून तसेच नंतर सागरी मार्गाने प्रवास करायचे तेव्हा त्या भागामध्ये पोहोचायला वेळ किती लागतो यावरून त्रिकोणमितीच्या साहाय्याने त्यानी नकाशे बनविले होते. म्हणजेच त्याकाळी या नकाशांचा संबंध भूगोलापेक्षा जास्त गणिताशी होता.
मंडळी मी आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल याचा पुढिल भाग आम्ही लवकरच आपल्यासाठी घेवून येनार आहोत. धंन्यवाद !!