/> जेव्हा हॉटेलच्या रूममधील नळाला काळ्या रंगाचे पाणी येते | एलीसा लाम एक गूढ मृत्यू | mysteryes Death Elisa Lam ~ Edge Marathi

Pages

जेव्हा हॉटेलच्या रूममधील नळाला काळ्या रंगाचे पाणी येते | एलीसा लाम एक गूढ मृत्यू | mysteryes Death Elisa Lam

या जगात खूप आश्चर्यकारक घटना घडल्या आहेत ज्याला कधीच समजून सांगता येणार नाही 
असीच काहीसी न उलगडलेली घटना घडली आहे ज्याचे उत्तर आजपर्यंत कोणाजवळच नाही. 
1924 मध्ये बनलेले एक हॉटेल आहे ज्याचे नाव सेसील हॉटेल (CECIL HOTEL)आहे  जे लॉस अनजेलॉस मध्ये आहे आणि हे हॉटेल 24 माजल्याचे आहे,ज्याच्यात 700 रूम आहेत ज्याचा गेस्टला राहण्यासाठी  वापरल्या जात होत्या.  

हे हॉटेल जगातील सर्वत गूढ हॉटेलस पैकी एक होते जिथे खूप गेस्टने आपली जीवन यात्रा संपवली होती आणि अनेक जणांचे इथे खून झाले होते.
या हॉटेलचा भूतकाळ खूप भयानक घटनेने घेरलेला आहे,या हॉटेल मध्ये घडलेल्या घटनांबद्दलचे  संपूर्ण  एक विकेपेडईया पेज बघायला तुम्हाला मिळेल ज्यात इथे 
घडलेल्या सर्व घटनांचा आढावा आणि एक मोठी यादी आहे ज्यात कोणी कोणाला मारले आणि  कोनाचा कसा मृत्यू झाला हे सर्व तुम्हाला या पेजवर बघायला व वाचायला मिळेल;
जसे रिचर्ड रमिरेज (RICHARD RAMIREZ)हे या हॉटेल मध्ये गेस्ट म्हणून आले होते व त्याने 13 खून केले होते. 

एका हॉटेलच्या रूममधील नळाला काले पानी येते तेव्हा !

ही घटना जानेवारी 2013 मध्ये या हॉटेलमध्ये  घडलेली सत्य घटना आहे 
एक मुलगी या हॉटेलमध्ये येती आणि रूम बूक करती रीसेप्शनला तिला विचारले जाते की तुम्ही कसे राहायला पसंद कराल ?
रूम सेरिंग करून की एकटींसाठी एक वेगळा रूम करून ?
तेव्हा तिने सांगितले की मला सेरिंग रूम चालेल ! त्या नुसार तिला एक सेरिंग रूम बूक करून दिल जातो 
आणि ती आपल्या रूममध्ये जाते थोड्यावेळाने तिने फोन करून सांगितले की मला सेरिंग रूम नको मला माझ्या वेगळा रूम बूक करायचा आहे; 
कारण माझ्या सोबत जो माणूस आहे त्याच्या सोबत मला सुरक्षित वाटत नाही आणि तिने एक वेगळा रूम बूक केला
तिच्या म्हणण्यानुसार त्या माणसाची म्हणजे रूम जोडीदाराची वागणूक खूप विचित्र होती. 
तिने रूम बदलून वेगळा रूम तर केला पण त्या रूम मध्ये राहण्यासाठी ती राहिली नाही !
31 जानेवारी 2013 रोजी एलिसा लाम(ELISA LAM)ही महिला गायब झाली हॉटेल कर्मचाऱ्यांने तिला 
खूप शोधले पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. 
4 आठवड्यानंतर हॉटेलच्या रूममधील नळामधून काळ्या रंगाचे पाणी  येण्याची घटना घडली 
गेस्ट फोन करून रीसेप्शनला सांगू लागले सर्वांच्या तक्रारी येताना पाहून हॉटेल कर्मचारी तपास करू लागले 
तर त्यांच्या लक्षात आले की पाण्याच्या टाकीत काहीतरी पडले आहे म्हणून हा सर्व प्रकार घडत आहे. 
त्यांनी पाण्याची टाकी खोलून बघितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्यात एलिसाचे मृत शरीर होते जे की मागील 4 आठवड्यापासून त्या पाण्याच्या टाकीत आहे 
त्या मुळे रूममध्ये काळे पाणी येत आहे. 

मागील 4 आठवड्यापासून तेच पानी ज्यात एलिसाचा मृतदेह होता हॉटेलच्या रेस्टोरेंटमध्ये व रूममध्ये व इतर ठिकाणी वापरले जात होते,
आणि कोणाला याची थोडीही कल्पना नव्हती जेव्हा पाण्याचा रंग गडद काळा येत होता तेव्हा लक्षात आले; तो पर्यन्त सर्वांने तेच पाणी वापरले. 
पोलिस केस झाली व पोलिस या घटनेची तपासणी करत होते तेव्हा हा एक आत्महत्तेचा प्रयत्न आहे या निष्कर्षापर्यन्त येऊन पोहोचले;
पण काही मजबूत पुराव्यानुसार पोलिस पण चक्रावून गेली की ही मुलगी एवढ्या वर पाण्याच्या टाकीपर्यंत कशी जाऊ शकेल ?
कारण पाण्याच्या टाकीपर्यन्त जण्यासाठी तिला आधी हॉटेलच्या छतावर जावे लागेल आणि छतावर जाण्यासाठी छताचा दरवाजा उघडावा लागेल आणि छताचा दरवाजा तर खूप सुरक्षित आहे तो उघडला तर सर्व हॉटेलमध्ये 
अलार्मचा आवाज झाला असता आणि असे तर काही झाले नाही मग ही तिथ पर्यन्त काशी जाऊन पोहोचली असेल ?
काही जणांचे म्हणणे होते की हा एक नियोजनबद्ध खून आहे तर काही जन म्हणत होते की आत्महत्या आहे !
जेव्हा सी सी टी व्ही चे विडियो चेक करण्यात आले तेव्हा ती लिफ्ट मध्ये दिसली आणि खूप विचित्र वर्तवणूक करताना दिसली, वेग वेगळे हातवारे करताण दिसली 
आणि ती लिफ्ट मधून बाहेर येताना दिसली हा एकच शेवटचा विडियो हॉटेल मॅनेजमेंटकडे आहे !
एलिसा लामचा मृत्यू एक गूढ रहस्य आहे ज्याचे उत्तर न हॉटेल मॅनेजमेंटकडे आहे न पोलिस डीपार्टमेंटकडे ! 
जगातील हे गूढ रहस्य आज ही रहस्यच बनून राहिले आहे त्या (CICIL HOTEL) मध्ये. 
मी आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल 
धन्यवाद!!
Previous
Next Post »