/> जगातील सर्वात मोठे शिवलिंग ज्याच्या मंदीराची निर्मिती अपूर्ण राहिली ! का ? ते वाचा सविस्तर. ~ Edge Marathi

Pages

जगातील सर्वात मोठे शिवलिंग ज्याच्या मंदीराची निर्मिती अपूर्ण राहिली ! का ? ते वाचा सविस्तर.


भारताला देवभूमी असे समजले जाते.
भारतामध्ये एका पेक्षा एक प्रशीद्ध देवाचे मंदिर आहेत.
हे मंदीर येवढे सुंदर आणि आकर्षीत आहेत की मंदीर बघण्यासाठी
देशातीलच नाही तर विदेशातुन पण लोक भारतात दाखल होतात.
इथे असंख्य मंदीर आहेत ज्यांना चमत्कारी आणि रहश्यमई मानले जाते.
जिथे सकाळ झाली की भजन व कीर्तन आपल्या कानी पडते.
जिथे ढोल ताशा आणि मंदिरांच्या घंट्या वाजलेला आवाज कानावर पडतो.
खास कार्यक्रमात मंदिरावर विधुतरोषणाई केली जाते.
तिथे या मंदीरा बद्दल असंख्य अशा प्राचीन व दंत कथा आपल्याला बघायला मिळतात.
अशाच 5 मंदीरा बद्दल आम्ही माहिती घेउन आलो आहोत ज्याला बघुन तुम्ही 
आश्चर्यचकित होवून जाल. आणि जगातील सर्वात मोठे शिवलिंग ज्याच्या मंदीराची निर्मिती अपूर्ण राहिली ! ते का ? अपूर्ण राहिले हे या लेखातून वाचा
ज्या मंदिरां बद्दल भरपुर रहश्य आहेत जे आज पर्यंत कोणीच उलगडू शकले नाही 
ना विज्ञान ना अध्यात्म.
नमस्कार मंडळी मी बेगाजी परत एकदा तुमच्या शेवेत हाजर आहे.
आणखी एका रहश्यांनी भरलेल्या माहिती सोबत.
ज्यामध्ये तुम्हाल 5 मंदीर व त्याच्या रहश्याची माहिती दिली जाईल.
आपल्या पैकी कोणी या मंदिरांना भेट दिली आहे का ?
अम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
चलातर मग सुरु करू.


1 कालभैरव मंदीर - उज्जैन

भैरवगढ इथे शिप्रा नदीच्या किनारी हे कालभैरव मंदीर आहे.
या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की इथे देवाला दारु प्रसाद म्हणून अर्पण केली जाते.
आणि एका प्लेट मध्ये ती दारु देवाला पाजली जाते 
आणि चमत्कारीक रित्या बघता-बघता ती दारुने भरलेली प्लेट रिकामी होते.
ही दारु नक्की कुठे जाती हे एक रहस्य आजही कोणी उलगडू शकले नाही.
पाण्याचा एखाद्या थेंब मातीच्या ढेकळावर पडून जसे
क्षणात ढेकूळ जसे कोरडे होते त्या प्रमाने ती प्लेट रिकामी होते.
इथे रोज लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी जमती फक्त हे सर्व दृश आपल्या डोळ्यांनी बघता यावे.
पण काल भैरवनाथाला दारु अर्पण करताना मात्र तुमच्या मनात शुध्द विचार असले पाहिजे
असे भाविकांचे म्हणने आहे.
धार्मिक दृष्ट्या विचार केला तर दारुमध्ये सुराभी शक्ती आहे म्हणून दारुचा आती वापर करूनाही,
आती वापर केला त्याची बूद्धी भ्रष्ट होती.
मंदिराच्या पुजाराच्या म्हणण्यानुसार मंदिराचा इतिहास स्कंदपुरानात अवंती  
या खंडात पहायला मिळतो.
या मंदीरा बद्दल अनेक प्रचलीत कथा आहेत त्यानुसार एक अशी आहे की
उज्जैनचे राजा महाकाल यांनी काल भैरवनाथाला इथे लोकांच्या रक्षणासाठी बसवले आहे.
काही वर्षाआधी या मंदिराचा जिर्नोधार करण्यासाठी मंदिराच्या चारी बाजुनी खोद काम करण्यात आले होते
त्यात 12 फुटाचा खोल खड्डा करण्यात आला होता.
स्थानिक लोक हे बघण्यासाठी जमले होते की जेव्हा मुर्ती दारु पिवून संपवते तेव्हा ती इथेच कुठे जाती की काय ?
पण या खोदकामात असे काहीच नाही मिळाले ज्याच्याने लोकांचे या उत्चक्तेचे समाधान होइल.
या मंदिराचे हे गुढ ऊकलन्यासाठी इथे वैज्ञानिक येऊन त्यांनी पहाणी केली पण सर्व प्रयत्न निस्फळ ठरले
आणि त्यांना ही इथून रिकाम्या हातानेच परत जावे लागले.



2 जगंन्नाथ पुरी मंदीर - ओडिसा 

पुरीच्या पवित्र भुमिवर भगवान जगन्नाथ, भगवान बलराम
आणि शुभद्रा यांचे भव्य दिव्य आणि जगप्रशीद्ध मंदीर आहे.
हिंदू पंचांगातील आषाढ महिन्यात देवांची रथ यात्रा काढली जाते. 
आणि हा नयनरम्य सोहळा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो,
आणि या रथाची दोरी ओढायला किंवा नुसता हात तरी आपल्याला लावायला मिळेल
या एका आशेपोटी जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात.
मणुष्यप्राण्याला मोक्ष हवा असेल तर जीवनात एकदा तरी जगन्नाथ पुरी येथील
भगवान जगन्नाथ स्वामीच्या या रथाच्या दोरीला हाथ लावायला हवा.
या झाल्या मंदिराबद्दलच्या गोष्टी ज्या तूम्ही मानल्या तरी ठिक न मानल्या तरी ठिक
हे तुमच्या श्रद्धेवर डिपेंड करते.
पण या मंदिराबद्दलचे जे गुढ वैज्ञानिकच काय आत्ता पर्यंत कोणालाच उलगडले नाही. 
हे मंदीर जेवढे भाविकांच्या श्रद्धेच स्थान आहे तेवढेच गुढही आहे.
या मंदिराच्या कळसावरील लाल रांगाचा
झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो.
हे गुढ आश्चर्यचकित करणारे आहे.
मी आधी सांगीतल्याप्रमाणे हे का होते हे कोणालाच माहित नाही.
हा झेंडा रोज संध्याकाळी मंदिरावर चढून हाथाणे बदलला जातो.
झेंडा पण खूप भव्य आहे जेव्हा तो हवेत फडकला जातो तेव्हा सगळे बघतच राहतात.
याच प्रमाणे आणखी एक रहश्य आहे आहे की मंदिराच्या कळसाची सवली मात्र अदृष्यच आहे
कळसाच्या सावलीला अजपर्यंत जमीनीवर कोणीच बघितली नाही.
जर तुमच्यापैकी कोणी जगन्नाथ पुरी दर्शन केले आहे.
तर हे खर आहे की फक्त काल्पनिक कथा कमेंट करू सांगा.

3 मेहर माता मंदीर - मध्येप्रदेश

मध्ये प्रदेशच्या सतना जिल्हातील मेहर मध्ये चित्रकुट पर्वतावर मेहेर देवीचे मंदीर आहे.
हे मेहेर देवीचे मंदिर शक्ती पिठ आहे असे ही संगीतले जाते.
मेहेर या शब्दाचा अर्थ आहे देवीचा हार आसा होतो
या मंदिराची पवित्रता किती महान आहे हे 
या एका गोष्टीवरुण ठरवता येईल 
इथे आत्ताही सकाळी सकाळी देवीची पूजा करण्यासाठी आलाह स्वता: येतात.
मंदिराचे पुजारी सांगतात 
आजही देवीचा साज शृंगार हा आलाहच्या हातूनच केला जातो 
जेव्हा आम्ही सकाळी ब्रम्हा मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडतो
तेव्हा देवीची पूजा झालेल्या अवस्थेत बघायला मिळते
अशा या आश्चार्याने भरलेल्या मंदिराचे हे रहश्य उलगडण्यासाठी
वैज्ञानिक गेली बरीच वर्षा इथे पालठोकून बसले आहेत.
पण हे गुढ आजही तसेच आहे.
एका कथेनुसार जेव्हा महादेव तांडव करत होते तेव्हा त्यांच्या खंद्यावर पर्वतीमातेचे शव ठेवलेले होते
पर्वतीमातेच्या सगळ्यातला हार निघुन इथे त्रिकूट पर्वतावर येऊन पडला
आणि ही जागा एक शक्तीपिठ बनले जे मेहेर देवीचे मंदीर या नावाने प्रशीद्ध झाले.

4 ज्वालादेवी मंदीर - हिमाचल प्रदेश 

हिमाचल प्रदेशातील काँगड़ा या गावा पसूण 30 किलो मिटर अंतरावर हे ज्वाला देवीचे प्रशीद्ध मंदीर आहे.
या मंदिराला ज्योतीवाल्या मातेचे मंदीर आणि नगरकोट या नावाने ही ओळखले जाते.
हे मंदीर देवीच्या इतर मंदीरपेक्षा खूप अनोखे आणि चमत्कारी आहे 
कारण इथे कोणत्याच मूर्तीची पूजा केली जात नाही.
तर इथे पृथ्वीच्या उदरातून निघणाऱ्या आगीची पूजा केली जाते
मंदीरामध्ये अनंतवर्षा पसूण या ज्योती जळत आहेत हे मंदीर भारतामधील 51 शक्तीपिठांपैकी एक आहे 
इथेच देवी सतीची जीभ पडली होती.
मंदिराच्या अंगणात गोरख डीब्बी नावाचा एक पाण्याचाकूंड आहे या कुंडातील पाणी हे गरम उखळते आहे.
पण आपन जेव्हा त्या पाण्याला हाथ लावला तर ते हाताला थंड जाणवते.

5 भोजेश्वार शिव मंदीर - भोजपुर

मध्ये प्रदेशची राजधानी भोपाल पासूण 32 कीलो मीटर दुर असलेले भोजपुर याच्याच डोंगरावर विशाल आर्धेनग्न एक शिव मंदीर आहे
या मंदिराला भोजपुर शिव मंदीर आणि भोजेश्वर मंदीर या नावाने देशभर ओळखले जाते.
या मंदिराचे निर्मितीकाम हे परमारवंश घराण्यातील प्रशीद्ध राजा  राजाभोज यांनी 
1010 इसवीसन पासूण 1055 इसवीसनच्या कार्यकाळात केले होते.
या मंदिरात अनेक गुढ लपले आहेत जे एखाद्या चाबी नसलेल्या दरवाज्या प्रमाणे आहे 
दरवाजा आहे पण खोलायचा कसा ? हा प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही,
या मंदिराची शोभा व आपल्या मनातील उतचूकता वाढवनारी गोष्ट म्हणजे इथे असलेले विशाल शिवलिंग
जे एका अखंड दगडापासूण बनवलेले जगातील सर्वात मोठे शिवलिंग आहे.
या शिवलिंगाची उंची 18 फुट आणि घेर 8 फुटाचा आहे, आणि या शिवलिंगाची जमिनीपसूण वरची उंची ही 12 फुट आहे.
हे मंदीर अपूर्ण रहण्यामागील एकमेव कारण आहे राजा भोज यांची ईच्छा !
ती अशी की हे मंदीर फक्त एका दिवसातच पुर्ण झाले पाहिजे पण दिवस संपला आणि 
या मंदिराचे निर्मिती कार्य बंद करण्यात आले आणि हे मंदीर अपूर्ण वास्तु म्हणून तसेच राहिले. 
मंडळी ही होती भारतामधील 5 रहश्यमई मंदीरे ज्याची गुढ चमत्कारी माहिती 
जी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो होतो,
मी आशा करतो की तुम्हाला हा जगातील सर्वात मोठे शिवलिंग ज्याच्या मंदीराची निर्मिती अपूर्ण राहिली !  का ? वाचा सविस्तर.
लेख नक्की आवडला असेल. 
ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की नक्की सांगा ! 
हे मंदीरे बघण्यासाठी एकदा तरी जायला पाहीजे, 
आपल्या पैकी काहिंना मनसोक्त फीरण्याचा छंद असेलच त्यांनी नक्की या ठिकानी जाऊन यावे.
आणि जर कोनी आधिच जाऊन आले असेल त्यांनी आम्हांला आपला अनुभव सांगावा.
धंन्यवाद 
जय महाराष्ट्र
 
Previous
Next Post »