/> चीनसाठी हा मराठी मानूस देवासमान डॉ.कोटनीस २०२०/ Dr.kotnis 2020 ~ Edge Marathi

Pages

चीनसाठी हा मराठी मानूस देवासमान डॉ.कोटनीस २०२०/ Dr.kotnis 2020



नमस्कार मंडळी मी बेगाजी स्वागत करतो तुमचे मराठी यूट्यूब वर

लेख सुरु करण्या आधी अत्यंत महत्त्वाचे तुम्ही सर्व चांगले आहात की नाही.

मी अशा करतो आपन सर्व मस्त असाल

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या कोणीही घरा बाहेर पडू नका.

आपले हात सारखे सारखे साबण व पाण्याने स्वच्छ धुवा घरात लांब लांब बसा व कोरोना पसूण दुर रहा



जगात काही लोकांचे काम खूप मोलाच ठरत कधी कधी चीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की तो एका एका भरतीय कुटुंबाची हमखास भेट घेतो आणि ते कुटुंब म्हणजे महाराष्ट्रातील

मुंबईतील कोटणीस कुटुंबाची.



दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते.



डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव.



डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला.जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती.



त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं भारतीय वैद्यक मिशननं एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटनीस हे एक होते. ते आपलं काम अतिशय मन लावून करत असत.
















त्यांनी केलेल्या सेवेमुळं अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचले. युद्धभूमीवर प्लेगची भीषण लागण झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डॉक्टर लोक घाबरत असत पण कोटणीस कधी घाबरले नाहीत.



त्यांनी किमान 800 जणांवर उपचार केले असावेत असं म्हणतात. तिथल्या भीषण परिस्थितीमुळं त्यांच्यासोबत भारतातून आलेले डॉक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्याया समर्पण भावामुळेच त्यांचा चीनमध्ये आदर केला जातो.



चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाचं पोस्टाचं तिकीट छापलं आहे. चीन च्या हंबे या भागात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

या शतकातील 'चीनचे सर्वांत जवळचे परदेशी मित्र' असं सर्व्हेक्षण 2009 मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या यादीमध्ये नाव डॉ. कोटणीस यांचंही नाव होतं. डॉक्टरांचा आजही चीनमध्ये खूप आदर केला जातो असं चायना डेली या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.



वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी 1946 साली डॉ. कोटणीस यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं.
















डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावर चिनी व भारताच्या विविध भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या विविध स्वभावपैलुंवर प्रकाश टाकला गेला. “ डॉ.कोटणीस की अमर कहानी ” हा त्यांच्या आयुष्यावर आधारीत आसलेला चित्रपट ज्याची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय चित्रपती व्ही.शांताराम यांनी केला होता. या चित्रपटांने १९५७ साली सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” या पुरस्कारावर नाव कोरले.

मी आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल



धन्यवाद !



Previous
Next Post »