/> तुम्ही तूमच्या मुलाला हे प्रश्न विचारलेत का ? तुला कोण आवडते आई की बाबा ? ~ Edge Marathi

Pages

तुम्ही तूमच्या मुलाला हे प्रश्न विचारलेत का ? तुला कोण आवडते आई की बाबा ?

कोरोना ईफेक्ट


पालकांसाठी एक गृहपाठ
कोरोनामूळे खरतर पालकांना खूप फायदा झाला आहे.
तुम्ही म्हणाल ते कसा तर मंडळी या कोरोनामुळे सर्व शाळा कार्यालये दुकान गार्डन फिरायला जाण्याचे सर्व ठिकान हे बंद आहेत.
मग तुम्ही म्हणाल की ह्याचा पालकांना कसा फायदा झाला या उलट नुकसान झाल,
जस मूलाला गोष्ट सांगा,त्याच्या प्रश्ननाचे उत्तर सांगा.
त्याची बडबड एकुण घ्या नुसता वैताग आणलाय कार्ट्यान असे तुम्ही विचार करत असाल.

मंडळी तुम्ही जर असे विचार करत असाल तर तुम्ही इथे चुकत अहात,
ते कसे आम्ही तुम्हाला सांगतो
आपल्या धावपळीच्या जीवनात आपन काय कमावले फक्त पैसा,
आपन आपल्या आईला,वडिलांना, मित्रांना,मुलांना, येवढ कशाला मंडळी आपन आपल्या बायकोला तरी वेळ देऊ शकतो का ?
नाहीना !
मग आता तुम्हाला ती संधी मिळाली आहे
आपलं मूल आहे तरी कसं हे समजून घेण्यासाठी त्याला बोलकं करण्यासाठी हे विषय.
गंमती खेळत खेळत यातले विषय काढायचे मूल काय बोलतं ते नीट ऐकायचं समजून घ्यायचं.


१) आवडता रंग ?


२) आवडतं फुल ?


३) आवडतं गाव ?


४) आवडता लेखक ?


५) आवडतं काम ?


६) आवडता खेळ ?


७) आवडतं पुस्तक ?


८) आवडता चित्रपट ?


९) आवडता ऋतू ?


१०) काय करायला आवडतं ?


११) खूप वाईट कशानी वाटते ?
कोणी वाईट म्हटलं की वाईट वाटतं ?किती ?


१२) अनोळखी माणसांशी बोलायची लाज वाटते का ? भीती वाटते का ?


१३) घरातलं वातावरण आनंदी ठेवायला काय करतो ?


१४) भीती कशाकशाची वाटते ?
भीती वाटली की काय करतोस ?


१५) राग कशाचा येतो ?
राग आला की काय करतेस ?


१६) घरातल्यांबद्दल कधी प्रेम तर कधी द्वेष असं वाटतं का ?


१७) नेहमी आनंदी राहावं असं वाटतं का ?


१८) तू नशीबवान आहेस असं केव्हा वाटतं ?


१९)घरात खेळायला आवडतं का बाहेर ? का ?


२०) घरी आलं की छान वाटतं का ?


२१) शाळेत सर सांगतात ते सगळं खरं मानतोस का ?


२२) स्वप्न पडतात का? कसली?


२३) आई वडीलांच्या परवानगी शिवाय काय काय करतोस ?


२४) तुला कशी माणसं आवडतात ? कशी माणसं आवडत नाही ?


२५ ) कोणते पदार्थ आवडतात ?

२६) काय शिकायला आवडेल ?


२७ ) काय चांगलं करता येतं ?


२८) वेळेचं महत्त्व कळतं का ?


२९) वर्गात काही कळलं नाही तर प्रश्न विचारतोस का ?


३०) मित्रांशी भांडणं होतात का ? कोणत्या कारणांवरून ?


३१ ) झालेली भांडणं घरी सांगतोस का ? का नाही ?


३२) कोणाबरोबर अभ्यास करायला तुला आवडतो ? आपल्यापेक्षा हुशार मुलांबरोबर की अजून कोणा बरोबर ? का ?


३३) दुसर्‍यांच्या घरी जायला आवडतं का ? का ?


३४ ) शिक्षेची भिती वाटते का ?


३५) कोण व्हावंसं वाटतं ?


३६) कशाची काळजी वाटते ?


३७) लोकांना तू आवडतोस का ?
का आवडत नाही ?


३८) लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करतोस ?


३९) आई वडिलांच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत ?


४०) इतर मित्रांच्या घरचं काय काय आवडतं ?


४१) खेळ कोणते खेळतोस ? कशा कशाचा छंद आहे ?


४२) तुझी प्रकृती कशी आहे असं वाटतं ?


ही यादी अजून खूप वाढवता येईल. व अशा प्रकारे अनेक प्रश्न विचारुन आपलं मूल कसं आहे हे समजून घ्यायला मदत होईल.

आणि.
करोना प्रादूर्भावामुळे हाती लागलेला फँमिली टाईम सत्कारणी लागेल.
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.
https://wa.me/918149140698
धन्यवाद !


Previous
Next Post »