/> गुढीपाडव्याला कडूलिंंब का खातात ?2020गुढीपाडवा खास Gudhipadwya la kaduli... ~ Edge Marathi

Pages

गुढीपाडव्याला कडूलिंंब का खातात ?2020गुढीपाडवा खास Gudhipadwya la kaduli...



सध्या जगभरात कोरोना ने थैंमान घातले आहे , चीन, इटली, अमेरिका , जापान, जर्मनी, सारख्या आधुनीक देश या VIRUS च्या कचाट्यात सापडले आहेत,
त्याचा फटका अपल्या भरताला ही बसला आहे,त्यात आता नवीन वर्षाचा पहिला सण तोंडावर येउन ठेपला आहे,
सण म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे,किंबहूना सणांचा हेतूच तो आहे, पण त्याचवेळी हे सण का सुरु झाले, याचा ही कुठे तरी शोध घेतला पाहिजे, गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, त्या दिवसापासुन काळाने चालणे सुरु केले, म्हणजे जो काळ आपन आज मोजतो, त्याचा आरंभबिंदू हा होता.
किती चांगली कल्पना आहे ?
खरे तर त्या मागची कल्पना ही किती छान आहे ? एक समान गतीने चालणारा काळ सुरु झाला, त्या वेळची स्थीती काय असेल ?
तो ज्या गतीने सुरु झाला , तिच त्याची आजचीही गती आहे, दिवस,रात्र कुस बदलत आहेत.
काळ चालतोच आहे, तो कधी थांबणार नाही, कारण ज्या दिवशी तो थांबेल, त्या दिवशी सगळेच थांबेल.
ही पृथ्वी निश्चेस्ट होऊन पडेल. सगळे काही जड, अचेतन होऊन जाईल.
कल्पनासुद्धा किती भयंकर वाटते ?
म्हनूणच हा काळ चालतोय, म्हणून त्यला नमस्कार करण्यासाठी हा सण आहे,
ब्रम्हानेच या दिवशी मनुष्यप्राण्याची निर्मिती केली. कोट्यवधी वर्षापूर्वी माणसाने पृथ्वीवर जन्म घेतला, त्यावेळी तो गुढीपाडवा म्हणून त्याच्या लेखी त्याचे काहीही महत्व नसेल.
कारण त्याच्यासाठी जगण्याचा संघर्षच समोर टाकला होता,

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्षाप्रतीपदा अर्थात गुढीपाडवा,तसेच गुढी पाडवा हा साडेतीन मूहुर्तातील एक सण मानला जातो.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते, बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाची पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो.
दारासमोर रांगोळी घालून अशी तयार केलेली गुढी उभी केली जाते.
या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा अपल्याला माहितीच असेल,
पण कधी हा विचार केला का हो ?
की ही पाने का खाल्ली जातात,
नाहीना,
मित्र हो आयुर्वेदाचा जनक म्हणून आपला भारत देश सर्व जगात ओळखला जातो,
खूप प्राचीन काळापासुन आपन गुढी पाडवा हा सण साजरा करतो,
कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजलेली डाळ, जिरे , ओवा, हिंग , चिंच, गुळ , मिसळून प्रसाद तयार केला जातो व सर्वना तो दिला जातो,
हा प्रसाद खाल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात.
शरीराला कार्य करण्या साठी उर्जा प्राप्त होते,
म्हणून फक्त याच दिवशी कडुलिंबाचे शेवन करायचे नसून, या दिवसापसूण वर्षभर याची आठवन रहावी हे सुचवले आहे.
कडुलिंबाची पाने, फुले, फळे, मुळे, आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होतो, पाने कडू लागत असली, तरी आपल्या गुणांनमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी याचे शेवन केले जाते.
याने पोटातील जंत दुर होण्यास मदत मिळते.
कडुनिंबाने अंगावर उठणारी खाज व इतर त्वचेसंबंधी तक्रारी दुर होतात,
तसेच वर्षभर कडुनिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापसूण दोन महिनेही याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर याचा लाभ होतो.






Previous
Next Post »