१३ हा आकडा अशुभ का मानला जातो, आपल्या आजूबाजूस कोणी तरी शिंकल्यास गॉड ब्लेस यु असे का म्हणतात, तुटणाऱ्या ताऱ्यांकडे मागणे का मागतात, आरशाला तडे गेल्यास त्यामध्ये आपली प्रतिमा का पाहू नये, मांजर आपल्या रस्त्यातून आडवे गेलेले का वाईट समजले जाते, अशा अजून कित्येक अंधश्रद्धा आपल्या अवतीभवती पाळल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली ह्याची माहिती आज तुम्हाला मी देनार आहे
नमस्कार मंडळी मी बेगाजी स्वागत करतो तुमचे.
प्राचीन काळी माणसे दळणवळणासाठी बैलगाडी तसेच घोडागाडी ह्यांचा प्रामुख्याने वापर करायचे. रात्रीच्या वेळेला जंगलातून मार्गक्रमण करत असताना मार्जार वर्गातील हिंस्त्र पशु जसे की वाघ, बिबट्या, रानमांजरे अनेकदा गाडीसमोर यायचे त्यामुळे गाडी हाकणारे बैल किंवा घोडे बिचकून जायचे आणि जागच्या जागी थांबायचे. अनेकदा त्यांच्यावर हल्ला केला जाण्याची पण शक्यता असायची. त्यामुळे गाडीमालक इतर लोकांना पण असे प्राणी समोर आल्यास थांबायला सांगायचे. ह्यातुन पुढे असा प्रघात पडला की मांजर जर रस्त्यामध्ये आडवे आले तर ते अशुभ असते.
प्राचीन इजिप्त मध्ये काळे मांजर खूप शुभ मानले जायचे. पुढे अठराव्या शतकापर्यंत लोक मांजरांना शुभ मानायचे. ब्रिटनमधील एका राजाला मांजर खूप प्रिय होते. त्याचे आवडते मांजर मेल्यानंतर त्याने त्याचा शाही इतमामात अंत्यसंस्कार केला. पण मांजराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी राजाला कैद करण्यात आले आणि त्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी देहदंडाची शिक्षा देण्यात आली. ह्या घटनेसाठी लोकांनी त्या आवडत्या मांजराला कारणीभूत पकडले आणि पुढे मांजराना अशुभ मानले जाऊ लागले.
पण ह्या मागचे महत्वाचे कारण हे होते की त्या काळी आरसे खूप महाग असायचे तसेच अतिशय नाजूक पण असायचे. थोड्याश्या निष्काळजीपणामुळे ते फुटण्याचा धोका जास्त असायचा. ह्याला प्रतिबंध म्हणून आरसा फुटला तर ७ वर्षे वाईट जातील अशी भीती घालण्यात आली.
तांब्याची नाणी तलावामध्ये टाकल्यामुळे काही दिवसांनी त्यातील तांब्याचा काही अंश पाण्यामध्ये उतरतो. तसेच तांबे पाण्यातील कीटकांना मारण्यास पण मदत करते. त्यामुळे नाणी टाकलेल्या तलावातील पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो.
इतर संस्कृतीमध्ये पण १३ आकडा अशुभ असण्याबद्दलच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. ख्रिस्ती धर्मामध्ये लास्ट सपरच्या वेळेला ज्या अनुयायाने येशू ख्रिस्त ह्यांचा विश्वासघात केला त्याचा पण नंबर १३ वा होता.
आम्ही अशा करतो की तुम्हाला अह लेख व विडियो आवडला असेल.
आमचे आणखी लेख व वीडियो साठी आमचे यूट्यूब चेनल Subscribe करायला विसरु नका.
लिंक : https://www.youtube.com/channel/UCxkIzd0U6fdbcRLhyMeOHKw?view_as=subscriber
BLOG Link:
begajidukare.blogspot.com
नमस्कार मंडळी मी बेगाजी स्वागत करतो तुमचे.
● मांजर आडवे गेलेले का अशुभ मानले जाते?
प्राचीन काळी माणसे दळणवळणासाठी बैलगाडी तसेच घोडागाडी ह्यांचा प्रामुख्याने वापर करायचे. रात्रीच्या वेळेला जंगलातून मार्गक्रमण करत असताना मार्जार वर्गातील हिंस्त्र पशु जसे की वाघ, बिबट्या, रानमांजरे अनेकदा गाडीसमोर यायचे त्यामुळे गाडी हाकणारे बैल किंवा घोडे बिचकून जायचे आणि जागच्या जागी थांबायचे. अनेकदा त्यांच्यावर हल्ला केला जाण्याची पण शक्यता असायची. त्यामुळे गाडीमालक इतर लोकांना पण असे प्राणी समोर आल्यास थांबायला सांगायचे. ह्यातुन पुढे असा प्रघात पडला की मांजर जर रस्त्यामध्ये आडवे आले तर ते अशुभ असते.
प्राचीन इजिप्त मध्ये काळे मांजर खूप शुभ मानले जायचे. पुढे अठराव्या शतकापर्यंत लोक मांजरांना शुभ मानायचे. ब्रिटनमधील एका राजाला मांजर खूप प्रिय होते. त्याचे आवडते मांजर मेल्यानंतर त्याने त्याचा शाही इतमामात अंत्यसंस्कार केला. पण मांजराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी राजाला कैद करण्यात आले आणि त्याला राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी देहदंडाची शिक्षा देण्यात आली. ह्या घटनेसाठी लोकांनी त्या आवडत्या मांजराला कारणीभूत पकडले आणि पुढे मांजराना अशुभ मानले जाऊ लागले.
● फुटलेला आरसा हा अशुभ असतो आणि त्यात आपली प्रतिमा पाहू नये ?
प्राचीन काळी लोकांची अशी धारणा होती की आरश्यात दिसत असणारे प्रतिबिंब म्हणजेच त्या व्यक्तीचा आत्मा असतो. जर फुटलेल्या आरश्यात आपली प्रतिमा बघितली तर आपल्या आत्म्याला हानी पोहचते आणि ती भरून काढायला पुढे ७ वर्षे लागतात.पण ह्या मागचे महत्वाचे कारण हे होते की त्या काळी आरसे खूप महाग असायचे तसेच अतिशय नाजूक पण असायचे. थोड्याश्या निष्काळजीपणामुळे ते फुटण्याचा धोका जास्त असायचा. ह्याला प्रतिबंध म्हणून आरसा फुटला तर ७ वर्षे वाईट जातील अशी भीती घालण्यात आली.
● तलावामध्ये नाणी टाकल्याने चांगले दिवस येतात.
ह्यामागे शास्त्रीय कारण आहे. प्राचीन भारतामध्ये तांब्याची नाणी प्रचलित होती. तांबे माणसाच्या शरीरासाठी खूप फायद्याचे असते.तांब्याची नाणी तलावामध्ये टाकल्यामुळे काही दिवसांनी त्यातील तांब्याचा काही अंश पाण्यामध्ये उतरतो. तसेच तांबे पाण्यातील कीटकांना मारण्यास पण मदत करते. त्यामुळे नाणी टाकलेल्या तलावातील पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो.
● आपल्या आजूबाजूस कोणी शिंकल्यास 'गॉड ब्लेस यु' असे आपण का म्हणतो?
काही शतकांपूर्वी इटलीमध्ये एका भयानक रोगाने थैमान घेतले होता ज्यामुळे शेकडो लोकांचा बळी गेला होता. एकामागून एक येणाऱ्या भयंकर शिंका हे ह्या रोगाचे एक प्रमुख लक्षण होते. त्यामुळे पोपने असा हुकूम काढला की आपल्या आजूबाजूस कोणी शिंकले तर त्याच्या स्वास्थ्यासाठी आपण प्रार्थना करावी आणि 'मे यु एन्जॉय गुड हेल्थ (तुला चांगले आरोग्य लाभू दे)' असे म्हणावे आणि तो माणूस जर एकटा असेल तर त्याने 'गॉड हेल्प मी (देवा मला मदत कर)' असे म्हणावे. पुढील काळात पहिले वाक्य छोटे करून त्याचे 'गॉड ब्लेस यु (देव तुझ्यावर कृपा करो)' असे बोलले जाऊ लागले.● १३ अंक अशुभ का मानला जातो ?
ह्याचे उत्तर नॉर्स पुराणामध्ये लपलेले आहे. एकदा १२ नॉर्स देवांना ऍसगार्ड म्हणजेच देवलोकामध्ये मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. दुष्ट देव असा लौकिक असणाऱ्या लोकीने त्या मेजवानीला आगंतुकपणे १३ वा देव म्हणून हजेरी लावून रंगाचा बेरंग केला. इतर १२ देवांनी त्याला तेथून हाकलून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचे रूपांतर युद्धामध्ये झाले. त्या घनघोर युद्धात सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता असा देव बाल्डर ह्याचा मृत्यू झाला. त्यामुळे १३ आकडा अशुभ मानला जाऊ लागला.इतर संस्कृतीमध्ये पण १३ आकडा अशुभ असण्याबद्दलच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. ख्रिस्ती धर्मामध्ये लास्ट सपरच्या वेळेला ज्या अनुयायाने येशू ख्रिस्त ह्यांचा विश्वासघात केला त्याचा पण नंबर १३ वा होता.
● आकाशात तुटलेला तारा दिसत असताना मागितलेले मागणे पूर्ण होते ?
प्राचीन काळी लोकांची अशी धारणा होती की आपले देव अवकाशातून आपल्यावर लक्ष ठेऊन असतात. ह्यासाठी तुटणारे तारे देवांकडून वापरले जातात. त्यामुळे ह्या ताऱ्यांकडे सर्वात प्रथम जो मागणे मागेल त्याची मागणी देवापर्यंत पोचते आणि पूर्ण होते.● वाढदिवसाच्या केक वर मेणबत्त्या का लावल्या जातात?
पुरातन काळी ग्रीक लोकांमध्ये वाढदिवसाला केक बनविला जायचा. त्यावर मेणबत्ती लावल्यास तो चंद्राप्रमाणे भासतो आणि त्यामुळे चंद्रदेव आर्टेमिस प्रसन्न होतो असे समजले जायचे. त्याच्या आशिर्वादामुळे चांगले दिवस येतात असे पण मानले जायचे. ह्यातुन वाढदिवसाच्या केक वर मेणबत्ती लावायचा प्रघात पडला आणि अजून पाळला जातो.आम्ही अशा करतो की तुम्हाला अह लेख व विडियो आवडला असेल.
आमचे आणखी लेख व वीडियो साठी आमचे यूट्यूब चेनल Subscribe करायला विसरु नका.
लिंक : https://www.youtube.com/channel/UCxkIzd0U6fdbcRLhyMeOHKw?view_as=subscriber
BLOG Link:
begajidukare.blogspot.com